Breaking News

प्रतिष्ठान महोत्सव साजरा करून रोजगाराच्या संधी निर्माण करा - डॉ. रगड़े


संपूर्ण जगात पर्यटन उद्योगाची भरभराट होत आहे. पैठणसारख्या पौराणिक व धार्मिक वारसा असलेल्या शहरात ‘प्रतिष्ठान महोत्सव’ साजरा करून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठाचे पर्यटन विभाग संचालक डॉ. राजेश रगड़े यांनी केले. 

बुधवारी {दि.२८} सकाळी अकरा वाजता येथील संत एकनाथ सार्वजनिक वाचनालयात पार पडलेल्या पैठण पर्यटन विकास कार्यशाळेत ते बोलत होते. माजी प्राचार्य रामदास वल्ले, भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, गुरुकुलच्या अश्विनी लखमले, प्रसिद्ध व्यापारी लखा आहूजा, प्रा. संदीप कापसे आदी उपस्थित होते. यावेळी झालेलय चर्चासत्रात दिनेश पारीख, विष्णु ढवळे, गणेश मड़के, अॅड. संदीप शिंदे, विष्णू सोनार, मदन आव्हाड, समर्थ पवार, सुखमल मोतियानी, जगन्नाथ जमादार, विशाल करकोटक, शाम पंजवानी, सौरभ सातघरे, भिमसिंह बुंदिले आदींनी भाग घेतला. सूत्रसंचालन हर्षदा सातघरे यांनी केले. नानक वेदी यांनी आभार मानले.