Breaking News

शब्दरंग कवी-कट्टा कार्यक्रम संपन्न

अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान, सफाळे यांच्यातर्फे दि. 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पालघर तालुक्यातील सफाळे येथे शब्दरंग कवी-कट्टा हा कार्यक्रम पार पडला. निमित्त होते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषादिनाचे. 

गेरुचा ओहोळ येथील डॉ. मेघाणी उद्यानात निसर्गरम्य वातावरणात एक सुंदर कार्यक्रम सादर झाला. मान्यवर साहित्यिक डॉ. नेताजी पाटील, सफाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस जितेंद्र ठाकूर, डॉ. विलास पोसम यांसारखे मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सफाळ्यातील ज्येष्ठ लेखक- कवी श्री. धनंजय आकरे ह्यांना निमंत्रित करण्यात आले होते. पालघर जिल्ह्याच्या विविध भागांमधून तीसपेक्षा जास्त प्रतिभावंत कवी - कवयित्री उपस्थित होते. पालघर साहित्य मंच, शब्दांगण संस्था यांसारख्या मराठी साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या जिल्ह्यातील संस्थांचे साहित्यिक प्रतिनिधीही आवर्जून उपस्थित होते. 
सफाळ्यासारख्या ग्रामीण भागात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सलग चार वर्षे यशस्वी आयोजन करणार्‍या अंतरंग प्रतिष्ठान संस्थेच्या तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मराठी भाषासंवर्धनासाठी उचललेले मोठे पाऊल आहे.