Breaking News

उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची शक्यता

जळगाव, दि. 08 मार्च - भुसावळ तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच हतनूर धरणातील जलसाठा 50 टक्यांपर्यंत घसरला आहे. यामुळे आगामी उन्हाळ्यात हतनूरवर अवलंबून असलेल्या तब्बल 130 गावे, नगरपालिका, रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर प्रकल्प आणि जळगाव व मलकापूर एमआयडीसीला पाणीटंचाईला टंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

गत मान्सून हंगामात धरणाच्या पाणलोटक्षेत्रात अल्प पाऊस झाला, असे असतानाही धरणाने 100 टक्के जलसाठा गाठून विसर्गदेखील केला होता मात्र परतीचा पाऊस नसल्याने धरणात उ शिरापर्यंत आवक राहिली नाही. यामुळे धरणातील जलपातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. उन्हाळ्याच्या पहिल्याच टप्प्यातही धरणात अवघा 50 टक्के जलसाठा राहिला आहे.