Breaking News

कारमधून लॅपटॉपसह कागदपत्रांची चोरी


हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी 10 हजार रूपयांचा लॅपटॉप, चेकबुक, आधारकार्ड डायरी आदी कागदपत्रे चोरून नेली. ही घटना केडगाव येथील संदीप हॉटेल शेजारी घडली. सचिन देशमुख रा. देवगिरी नगर, सिडको, वाळूंज, महानगर, औरंगाबाद यांनी त्यांची कार क्र. एम.एच 20 डी.व्ही. 4903 केडगाव येथील हॉटेल संदीपच्या पार्किंगमध्ये उभी असताना कोणतरी अज्ञात चोरांनी काच फोडून चोरी केली.