अखेर न्यायालयीन लढाई झरकरांनी जिंकली
तालुक्यातील मिरजगाव येथील बहुचर्चित असलेली माजीमंत्री दिवंगत राजाभाऊ झरकर यांनी येथील सीना कॉलनी वसाहतीमध्ये 1999 मध्ये सुरू केलेल्या भाऊसाहेब झरकर आश्रम शाळा ही परीसरातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केली होती. सुरवातीची 3 वर्ष विनाअनुदानित असलेली समाज कल्याण खात्याची ही आश्रम शाळा स्वखर्चाने चालवत सुरवातीस या आश्रम शाळेमध्ये 123 एवढा सुरूवातीलाच पट मिळाला, एवढ्या मुलांसाठी दोन वेळचे जेवन दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्या गोष्टी, शालेय गणवेश, शिकविण्याकरीता ऊत्तम शिक्षक कर्मचारी, यांचे व्यवस्थित नियोजन करून 3 वर्ष पदरमोड करत ज्ञानदानाचे काम अहोरात्र सुरू ठेवले.
3 वर्षानंतर या संस्थेस समाज कल्याण विभागाचे मासिक अनुदान सुरू झाले. तर नविन ठिकाणी सुसज्ज इमारत ऊभी करून, मुलांच्या निवासासह, आहाराची, शिक्षणाची, व्यायमाची तसेच अभ्यासाची सुसज्ज दालणे ऊभी केली गेली, 2006 साली राजाभाऊ झरकर यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी राजाभाऊ झरकर यांचे कनिष्ठ बंधू डॉ. रमेश झरकर यांच्यावर पडली. दिवसेंदिवस शाळेमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढत गेली. या शाळेला आदर्श आश्रम शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले.
सन 2014 मध्ये गणेश मधुकर जवकर नामक व्यक्तिने शाळेच्या काही फाईल्सची चोरी करून त्यामध्ये अध्यक्ष ते संचालक यांच्या नावांचा बदल करून, समाज कल्याण विभागाचे येणारे अनुदान लाटण्यास सुरूवात केली. याविषयी मिरजगाव पोलीस दूरक्षेत्रामध्ये गून्हा दाखल करण्यात आला होता. नंतर डॉ. रमेश झरकर यांनी नगर येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या न्यायालयामध्ये धाव घेतली. सर्व गोष्टी पाहता न्यायालयाच्या देखील या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता जवकर यांनी बदल अर्ज (चेंजिग रिपोर्ट) व संचालक मंडळाच्या तसेच संस्थेच्या अध्यक्ष व सचिव पदामध्ये पुर्णपणे बदल करून शासनाकडून बनावट कागदपत्रांचा वापर करून लाखो रूपये लुटलेचे निदर्शनात आले. हा प्रकार गेली 6 वर्ष सातत्याने चालला होता.
परंतू या 6 वर्षाच्या काळामध्ये मात्र विद्यार्थांना ऊपासमारीची वेळ सहन करावी लागत होती. तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देखील पगारासाठी तळमळावे लागत असल्याने व विद्यार्थांची ऊपासमारी पाहवत नसल्याने शिक्षकांनी उसनवारी करून थोडेफार का होईना विद्यार्थांच्या जेवणाची सोय केली होती, त्याच काळामध्ये संस्थेस अनुदान म्हणून साडे चार लाख रूपये देखील जवकर यांना मिळाले होते. परंतू न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करता दि. 9 मार्च 2018 रोजी झरकर यांच्या बाजूने निकाल दिल्याने शिक्षकांसह विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. या निकालानंतर डॉ. झरकर यांचा सत्कार मिरजगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.