वीज चोरी करणार्यांवर गून्हा दाखल
वीज वितरण महामंडळाच्या पोलवरील तारांवर आकडा टाकून लाईटचा वापर करणार्या चौघांविरूद्ध वीज वितरण कंपनीने कारवाई करून याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गून्ह्याची नोंद केली. लक्ष्मण आमले, हेमंत ढमढेरे, नर्मदा ढमढेरे, दत्तात्रय ढमढेरे, महेश गोरडे रा. माधवबाग यांच्याविरूद्ध कारवाई केली. यांनी बेकायदेशीररित्या तारांवर आकडा टाकून विजेचा चोरून वापर करताना पकडण्यात आले.
याप्रकरणी योगेश गोरखनाथ आभाळे रा. केडगाव, कक्ष. नं 1 म.रा.तवि.वि. कं. मर्यादित नगर-पुणे रोड यांच्या फिर्यादिवरून विद्यूत कायदा 2003 मधील कलम 135 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.