शेतकर्यांची अडवणूक केल्यास व्यापार्यांवर कारवाई करणार - सुभाष देशमुख
नाशिक, दि. 03, मार्च - कांदा उत्पादक शेतक-यांच्या खात्यात कांदा विक्रीची रक्कम थेट जमा केली जावी यासाठी व्यापारी व बँकांनी आरटीजीएस पद्धतीचा वापर करावा. शेतक -यांना मिळणारे धनादेश वटविण्यामध्ये वेळ जाऊन रक्कम थकित राहण्याचे प्रमाण वाढते आहे. पुढील तारखेचा चेक देऊन शेतकरयांचे पैसे महिनोंमहिने लटकवण्याचे प्रकार काही बाजार समित्यांमध्ये दिसुन आले आहे. यापुढील काळात शेतक-यांची कोणत्याही प्रकारे अडवणूक होणार नाही. अशी अडवणूक करणा-या व्यापारयांवर कठोर कारवाई केली जाणार असून यात संबंधित व्यापारयांचे परवाने देखिल रदद करण्यात येतील असेही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.