Breaking News

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 11 मार्च रोजी लसीकरणाचे नियोजन


जळगाव, दि. 03, मार्च - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत येत्या 11 मार्च रोजी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी नियोजन करावे. विशेषत: ग्रामीण व अति जोखमीच्या भागात ही मोहिम प्रभावीपणे राबवावी. अशा सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची आढावा बैठक जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी आरोग्य विभागाच्या अधिक ार्‍यांना जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील 3 लाख बालकांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर यांनी बैठकीत दिली तसेच केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले.