नारायण राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्विकारावी - रामदास आठवले


नाशिक, दि. 03, मार्च - नारायण राणेंना जर राज्यमंत्रीमंडळात स्थान दिले असते तर शिवसेना नाराज होऊन राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस मिळून सत्ता स्थापन होण्याची शक्यता होती. परिणामी फडणवीस सरकारला सत्तेपासून दूर व्हावे लागले असते किंवा मध्यावधी झाल्या असत्या त्यामुळे नारायण राणेंचा मंत्रिमंडळातील प्रवेश रखडला.राणेंनी राज्यसभेची ऑफर स्वीकारून राज्यसभेवर जावे तसेच शिवसेना नाराज जरी असेल तरी आगामी काळात शिवसेनेला विश्‍वासात घेऊ. कारण युतीशिवाय महाराष्ट्रात सत्ता येणे मुश्कील असल्याचेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. याच वेळी नारायण राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारावी असा सल्लाही त्यांनी राणेंना दिला आहे.केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज नाशिकच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी ते प्रेस क्लब ऑफ मिडिया सेंटर येथे माध्यमांशी संवाद साधत होते.