Breaking News

पुतळ्याची विटंबणा कणार्‍या पोलिस निरीक्षकास बडतर्फ करा विविध संघटनांची मागणी,


बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील इसरूळ येथील पोलीस निरीक्षक कालेगावकर यांनी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना व तोडफोड केल्याप्रकरणी जामखेड येथील दलित युवक आंदोलन मांतग समाजसह विविध संघटनांनी जामखेड तहसिल व पोलिस यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला.


पोलीस निरीक्षक कालेगावकर यांनी मांतग समाजाचे दैवत, महामानव विश्‍व साहित्यरत्न सत्यशोधक आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना तसेच तोडफोड करून तमाम महाराष्ट्रातील दलित व मांतग समाजाच्या भावनांवरती मोठा आघात केला असून अशा दुष्ठ प्रवृत्तीच्या पोलिस अधिकार्‍यास तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे. तसेच सदर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचबरोबर सदर घटनेची चौकशी करण्यास काही समाजबांधव गेले असता त्याच्यावर अमानुष लाठीचार्ज करून जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा मांतग समाजाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, होणार्‍या सर्व परिणामास जबाबदार शासन राहील अशा आशयाचे निवेदन दलित युवक आंदोलन संघटना, मांतग संघटनांसह आदी सर्व दलित समाजाच्या वतीने जामखेड तहसिल व पोलिस स्टेशन येथे देऊन सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.