शेवगावमध्ये जागतिक ग्राहक साजरा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत शेवगाव तालुका व तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने पार पडलेल्या ग्राहक मेळाव्यात तहसीलदार पाटील बोलत होते. यावेळी उपस्थित विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपस्थित नागरिकांनी आपापल्या अडचणींबाबत संबधित अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बन्सीधर आगळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी वीज वितरण विभागाचे के.व्ही. अडसुरे, आगर व्यवस्थापक सतीश बंदरे, वजन मापे मोजणी अधिकारी उद्धव सोनवणे, दुय्यम निबंधक भगवान खेडकर यांच्यासह गॅस व पेट्रोल पंपचालक यांनी ग्राहकांच्या अडचणी व सूचनांबाबत मार्गदर्शन केले. राजेंद्र मरकड, सुनील मगर, जलील राजे, रामनाथ पुंडकर, कॉ. संजय नांगरे, वसुधा सावरकर, एकनाथ कुसळकर, संतोष भुसारी, डॉ. अमोल फडके, प्रकाश तुजारे, दीपक तागड, गोरक्षनाथ शेलार, सुधीर बाबर, नारायण टेकाळे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. ग्राहक पंचायतीचे सचिव अशोक शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. पुरवठा अधिकारी नितीन बनसोडे यांनी आभार मानले.