Breaking News

वासुदेव फर्निचरच्या कामगारांना मिळणार एक लाखात घर


कर्जत तालुक्यातील राशिनच्या वासुदेव फर्निचरच्या कामगारांना एक लाखात घर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. संस्थापक अध्यक्ष मेघराज बजाज यांनी कामगारांसाठी ही विशेष योजना राबविली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन बजाज यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरु केला. सध्या त्यांचा व्यवसाय भराभराटीस आलेला आहे.त्यांच्या फर्निचर व्यवसायात लौकिक निर्माण झाला असुन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात त्यांचा माल पोहोचत आहे. त्यांच्या दातृत्वाच्या वृत्तीने त्यांची समाजात वेगळी ओळख झाली आहे. कर्जत, करमाळा आदी तालुक्यातील शाळांना त्यांच्याकडून मोफत फर्निचरचे वाटप केले जात आहे. आतापर्यंत लाखो रुपये किमतीचे फर्निचर त्यांनी सामाजिक भावनेतून वितरित केले आहे. त्यांच्या या कार्याचे तालुक्यातुन कौतुक होत असतानाच त्यांनी त्यांच्या फर्निचर कारखान्यात काम करणार्‍या कामगारांसाठी एक लाख रुपयात घर उपलब्ध करून देण्याची मेघराज गिफ्ट हाउस ही योजना आणली आहे. यासाठी कामगारांनी एक वर्षामध्ये प्रत्येकी एक लाख रुपये भरायचे आहेत. या घराची रचना 1 रूम, किचन, बाथरूम अशी आहे. त्यांच्या या योजनेने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बजाज यांच्यावर निष्ठा ठेवून कित्येक कामगार अनेक वर्षे येथे काम करित आहेत. राशिनसारख्या ठिकाणी व्यवसाय सुरु करुन त्यांनी उद्योग क्षेत्रात आदर्श निर्माण केला.त्यांच्या कार्याची दखल घेवून कुळधरण ग्रामविकास संघटनेचा आदर्श सामाजिकता पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे.