Breaking News

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी शिबीर


अहमदनगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 26 व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल ऍण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे दि.7 मार्च ते दि. 31 मार्च या कालावधीतविविध मोफत आरोेग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत रूग्ण तपासणी करण्यात येणार आहे. दरवर्षी राबविण्यात येणार्‍या या मोफत आरोग्य तपासणीशिबिराचा लाभ असंख्य रूग्णांना झाला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलला एन.ए.बी.एच. मान्यता मिळालेली असून ही मान्यता असलेले नगर जिल्ह्यातील 200 बेडस्‌चे हे पहिलेच हॉस्पिटल आहे. तसेच या शिबिरा दरम्यानएमआरआय तपासणी 2 हजार रुपये, सीटी अँजिओग्राफी 1500 रुपये, सिटी स्कॅन 1000 रुपये, सोनोग्राफी 300 रुपये, डिजीटल एक्स रे तपासणी 200 रुपयात केली जाणार आहे.

या शिबिरामध्ये दि. 7 मार्च ते 7 जून या कालावधीत दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (बिनटाका) शिबिर होणार आहे. यात लॅप्रोस्कोपीव्दारे पोटातील, बेंबी, हर्नियाची शस्त्रक्रिया 15 हजार रुपये, पित्ताशय काढणे शस्त्रक्रिया 12 हजाररुपये, स्त्रियांच्या गर्भाशयाची पिशवी काढणे 12 हजार रुपये, ऍपेंडिक्स शस्त्रक्रिया 9 हजार रुपये, लॅप्रोस्कोपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 2 हजार रुपये, मूळव्याधीवर इंजेक्शन व्दारे उपचार 4 हजार रुपये, गॅस्ट्रोस्कोपी 600 रुपयात करण्यात येणार आहे. या शिबिरात लॅप्रोस्क्रोपिक सर्जन डॉ.सतीष राजूरकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.निलोफर धानोरकर, डॉ.रवींद्र मुथा रूग्ण तपासणी करतील.