Breaking News

सध्याच्या काळात कौशल्याधिष्ठित ज्ञानावर भर द्या - डॉ. क्षितिज देशमुख

सोलापूर, दि. 03, मार्च - सध्याच्या काळात कौशल्याधिष्ठित ज्ञानावर भर द्या. कौशल्यावर प्रभुत्व असेल तरच तुम्ही यशाची शिखरे गाठू शकाल. साचेबद्ध अभ्यासक्रमावर अवलंबून न राहता अभ्यासक्रमापलीकडे जाऊन ज्ञान ग्रहण करा, असे प्रतिपादन झेस्ट सोल्युशन्स पुणेचे उपाध्यक्ष डॉ. क्षितिज देशमुख यांनी केले. केगाव येथील सिंहगड अ भियांत्रिकी महाविद्यालयात डिस्टा 2 के 18 या तांत्रिक महोत्सवास प्रारंभ झाला.


याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देशमुख मार्गदर्शन करीत होते. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, सिंहगड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. एस. एच. पवार, प्राचार्य डॉ. शंकर नवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. एस. एच. पवार व प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी राज्यभरातून तसेच परराज्यातून आलेल्या सुमारे 2000 विद्यार्थ्यांचे स्वागत करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 
डॉ. देशमुख म्हणाले, बहुराष्ट्रीय कंपन्यांत परराष्ट्रातील अधिकार्‍यांशी संवाद साधावा लागत असल्यामुळे इंग्रजीवर प्रभुत्व असणे ही काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या तांत्रिक महोत्सवातून आपल्या सुप्त गुणांना वाव मिळतो. यासाठी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत भाग घ्यावा.