Breaking News

पाणीपट्टी वाढीची किंमत सत्ताधा-यांना चुकवावी लागणार.

पुणे, दि. 03, मार्च - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या विश्‍वासाने मते देऊन सत्तेच्या सिंहासनावर भाजपला विराजमान केले. विरोधी पक्षात असताना पाणीपट्टी, मिळकत कर वाढीला विरोध करणारा भाजप पक्ष कसा सरड्यासारखा रंग बदलतो याची अनुभूती पिंपरी-चिंचवडकरांनी घेतली आहे. महापालिका सभेत पाणीपट्टी दरवाढीचा विषय पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर केला. हा विषय मंजूर करत असताना सभाशास्त्र गुंडाळत उपसूचनेला अनुमोदन न घेताच विषय उपसुचनेसह मंजूर केल्याचे जाहीर केले. हा निर्णय बेकायदेशीपणे घेतला असून पाणीपट्टी वाढीची किंमत आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला चुकवावीच लागेल, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी म्हटले आहे. तसेच पाणीपट्टी वाढीचा त्यांनी निषेध केला आहे. 
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भापकर यांनी म्हटले आहे की, भाजप विरोधीपक्षात असताना पाणीपट्टी वाढ, मिळकतकर वाढ अशा विषयांना कायम विरोध करीत होता. आज भाजपची पूर्ण सत्ता आहे. आपण मागील 10 महिन्यांमध्ये सत्ता राबवीत असताना 31 मार्च नंतरची ठेकेदारांची बिले अडवून महापालिकेचे 300 कोटी रुपये वाचविल्याचा दावा के ला आहे.