Breaking News

डोंबिवलीत घरगुती गॅस पुरवठा सुरु होण्यास स्थानिकांचा अडथळा

डोंबिवली, दि. 03, मार्च - महानगर गॅस कंपनीचे घरोघरी पाईपलाईनने गॅस पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु केले आहे. डोंबिवली ओद्योगिक निवासी भागातील काही ठिकाणी हा पुरवठा सुरु झाला आहे. मात्र अद्याप डोंबिवली शहरात हा पुरवठा सुरु झाला नाही म्हणून हे काम जोरात सुरु होते. पण काही भागात या कामासाठी स्थानिकांचा अडथळा येत असून त्यामुळे हे काम लांबले आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे 2019 पूर्वी संपूर्ण मतदार संघात घरोघरी गॅस पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करत असताना काही स्थानिक तथाकथित कार्यकर्ते वैयक्तिक फायद्यासाठी अडथळा निर्माण करत असल्याने हे काम रखडत आहे.
कर्मचार्‍यानी दिलेल्या माहितीनुसार सध्या कल्याण पूर्व, मानपाडा रोड मार्गे डोंबिवली मिलापनगरपर्यंत गॅस पुरवठा करण्यात आला आहे. डोंबिवली शहराला गॅस पुरवठा क रण्यासाठी सध्या सोनारपाडा भागात काम संथ गतीने सुरु आहे. येथील कामाला काही भूमिपुत्र अडथळा निर्माण करत असल्याची तक्रार आहे. यामुळे डोंबिवलीत गॅस पुरवठा सुरु होण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.