हॉटेल कामगाराचा आत्महत्त्येचा प्रयत्न
राहुरी विद्यापीठ परिसरातील कॅन्टीनच्या मालकाकडून सातत्याने होत असलेल्या अन्यायाला कंटाळून एका वेटरने राहुरी पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. खुद्द ठाणे अंमलदाराच्या दालनातच ही घटना घडल्याने पोलिस कर्मचार्यांमध्ये मोठी धावपळ उडाली.
येथील फुले कँन्टीनचा मालक प्रचंड काम करुन घेत असून खायला सतत शिळा भात खायला देत असल्याचा आरोप या वेटरने केला आहे. एकदिवशी भाताऐवजी या वेटरने चपाती खाल्ली असता मालकाने वेटरला लाकडी दांडक्याने त्याला जबर मारहाण करून त्यास कामावरुन काढले. तब्बल आठ महिन्यानंतर राहुरी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या कँन्टीनमध्ये गुलाब महादू सिनगारे {हल्ली मुक्काम- सिडको, नाशिक} हा वेटर म्हणून कामाला होता. काम करत असताना कँन्टीनचा मालक आसिफ {पूर्ण नाव माहित नाही} हा वेटर गुलाब सिनगारे यास जेवनात भात खायला द्यायचा. सतत भात खावा लागत असल्याने उपासमार व्हायची. एके दिवशी मालकाची नजर चूकवून वेटर गुलाब याने चपाती खाल्ली. याचा कँन्टीन मालक आसिफ यास राग आल्याने त्याने वेटर गुलाब यास लाकडी दांडक्याने दि. १९ एप्रिल २०१७ रोजी मारहाण करुन कामावरुन हाकलून दिले. अशा आशयाची फिर्याद राहुरी पोलिसात गुलाब सिनगारे याने दिली. त्यानुसार कँन्टीन मालक आसिफविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.