आत्मा मालिक चैत्रमहोत्सवाची तयारी पूर्ण
कोपरगाव ता. प्रतिनिधी दि.२६ प.पू. सद्गुरू माऊलींच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (आत्मा मालिक ध्यानपीठ) कोकमठाणच्या वतीने 28 मार्च ते 30 मार्च 2018 दरम्यान चैत्रमहोत्सव व आत्मानुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती संत परमानंद महाराज यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हटले की, यावर्षी चैत्रमहोत्सव हा तीन दिवसाचा आयोजित केलेला आहे. या तीन दिवसाच्या कालावधीत सकाळी 5.30 वा. योग व प्राणायाम ने सुरूवात होवून भजन, आरती, मौनध्यान, किर्तन असे दिवसभराचे कार्यक्रम राहणार आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक संकुलाचा अध्यात्मिक संदेश देणारा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. या कालावधीत, ह.भ.प.महेश्वर भगुरे महाराज यांची भजनसंध्या तर काल्याचे किर्तनसेवा ह.भ.प. धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे यांची असणार आहे. तसेच संगीतसम्राट कु. चैतन्य देवढे व कु. सोहम गोराणे यांची संगीतमय भक्तीवंदना असणार आहे.
30 मार्च (चौदस) च्या दिवशी सायं 5.00 वा. प.पू. सद्गुरू माऊलींच्या उपस्थितीत भव्य पायी दिंडी सोहळयाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दिंडीत बॅंन्डपथक, ढोल पथक, लेझीम पथम, सनई चौघडा, पालखी, कलशयात्रा व आत्मरथ यांचा समावेश असणार असून कलशयात्रेत 500 महिला सहभागी होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या भाविकांनी महाशिवरात्रीपासून उपवास केलेले आहे. त्यांचा आत्मानुष्ठानाचा विधी 28 मार्च रोजी सायं 6 ते 8 यावेळेत पार पडणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
या चैत्रमहोत्सवासाठी उत्सव, सत्संग व महाप्रसाद व्यवस्थेसाठी 50,000 चौ. फुट मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सत्संग हॉलमध्ये अद्यावयात ध्वनिक्षेपन यंत्रणा, एल.ई.डी.स्क्रिन लावण्यात आलेल्या आहे. भाविकांच्या सोईसाठी आश्रमाच्या वतीने प्रसाद व्यवस्था, स्वागत, दर्शन, वाहनव्यवस्था, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, पाणी पुरवठा इ. समित्यांचे गठण करण्यात आलेले आहे. या तीन दिवसीय महोत्सवासाठी येणाÚया सर्व भाविकांसाठी निवासव्यवस्था करण्यात आलेली आहे. आत्मा मालिक चैत्रमहोत्सवाचे थेट प्रक्षेपण ूूण्ंजउंउंसपाण्वतह या संकेतस्थळावरून होणार आहे.