येवल्यात शेतकर्यांचा रुद्रावतार; संचालक मंडळासह सचिवाला कोंडले
येवला दि.5/प्रतिनिधी : कांदा व्यापार्याने शेतकर्याला उलटया होईपर्यंत केली मारहाण केल्याचे प्रकरण व्यापारी आणि बाजार समितीच्या चांगलेच अंगलट आले असून आज बाजार समितीच्या आवारात अनकुटे ता. येवला येथील शेतकर्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, भारिप बहुजन महासंघ, मराठा सेवक संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना आदींनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वाल्मिक गायकवाड या शेतकर्यांना मारहाण करणार्या बाळू सानप व एकनाथ खेमचंद या व्यापार्यावर कलम 326 अनवव्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
व्यापार्याच्या खळ्यात बेशुद्ध पडलेल्या शेतकर्याला उपचारासाठी पाठवण्याचे सौजन्य ही व्यापार्यांनी न दाखवल्याने तालुक्यातील शेतकर्यांमध्ये प्रचंड रोष होता.. अनकुटे येथील शेतकर्यांनी आयोजित केलेल्या निषेध सभेसाठी तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
बाजार समिती संचालक व सचिवांच्या आडमुठे पणा वाढला तणाव...
बाजार समिती च्या आवारात शेतकरी तसेच जिल्ह्यातून आलेल्या विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी निषेध व्यक्त करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी सचिवांनी बाहेर येऊन मागण्यां संदर्भात चर्चा करावी अशी मागणी केली. मात्र सचिवांनी बाहेर येण्यास नकार दिला.
शेतकर्याला झालेला मारहाणीचा बाजार समितीशी संबध नाही अशी त्यांची भूमिका होती. संपूर्ण संचालक मंडळ सचिवांच्या केबीन मध्ये उपस्थित होते.