बीड (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढे उलटफेर होत नाहीत तेवढे बीडच्या राजकारणात पहायला मिळत आहेत. बीड जिल्हात मुंडेंचे वर्चस्व आहे. सत्ता केंद्र मुंडेच्या भोवती नेहमीच फिरत असते परंतु मागील आठवड्यात बीड जिल्ह्यात काही अशा घटना घडल्या त्यामुळे महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची राजकीय चर्चा रंगली, ना. पंकजाताई मुंडे स्वच्छ प्रतिमा असणार्या नेत्या म्हणून परिचीत आहेत. कार्यकर्त्यासाठी कधिही शिफारस करतांना स्पष्ट नकार देतात. प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. कामासाठी टक्केवारीची मागणी व ती पुर्ण झाल्याची कबुली देतांना त्यांचा पि. ए. कुलकर्णी यांचा ऍाडियो क्लिप बाहेर येताच जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली थेट ग्रामविकास मंत्र्याच्या नावावर टक्केवारीची बातचित बाहेर आल्याने पंकजा मुंडेही गोत्त्यात आल्या होत्या. परंतु ऍाडियो क्लिप बनावट असल्याचा आरोप कथित कुलकर्णी यांची परळी येथे गुन्हा दाखल केला यानंतर लागलीच विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचीही ऍाडियो क्लिप व्हायरल झाली. यामध्ये पंतप्रधान नी मुख्यंमत्री यांच्या विषयी अभद्र भाषाचा वापर करतांना धनंजय मुंडे आढळले. त्याच बरोबर तारांकीत प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैशाची मागणीही होतांना बोलले जात आहे. या प्रकारणीही खोटी ऍाडियो क्लिप बनवली आसल्याचा आरोप करत धनंजय मुंडेनी पोलीसात तक्रार दाखल केली. दोन्ही प्रकारणाची तपासणी होत सत्य बरोबर येईल तेंव्हा येईल परंतु दोन्ही घटना ऐकामाघुन एक घडल्या ना. मुंडेच्या पि.ए.च्या क्लिप नंतर धनंजय मुंडेंची क्लिप व्हायरल झाली. नेमके दोघात काय कनेक्शन आहे. याची चर्चा जोर धरत असतांना आष्टी- पाटोदा- शिरूरचे भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्यानेे जिल्हा हादरून गेला. थेट आमदाराने बलात्कार केला आसल्याचा आरोप झाल्याने पोलीस यंत्रणासह राजकीय नेतेही गोंधळून गेले. व गल्ली ते दिल्ली बीड जिल्हाची चर्चा रंगू लागली. मागील चार दिवसांपासुन पिडीत महीला पोलीस अधिक्षक कार्यालयाचे उंबरे झीजवत होती. प्रसार माध्यमांत प्रकरण आल्या नंतर पोलीस अधिकार्यांपासुन ते पोलीस महानिरिक्षका पर्यंत सर्वांनी खुलासे केले. दोन दिवस वाद सुरू असतांना महिलेच्या सासु सौ. करूळकर यांनी आष्टीत पत्रकार परिषद घेत सुन ब्लॅकमेलर आसल्याची माहिती दिली. जर सुन ब्लॅकमेलर होती तर यापुर्वी तिची तक्रार का करण्यात आली नाही. आमदार यांच्यावर आरोप होताच सासुही आमदांराच्या बाजुनी मैदानात उतरल्या असुन,आरोप आणखीन सिध्द होणार आहेत, तक्रार घेतली जाणार आहे, की मामला सेट होणार आहे? परंतु बीड जिल्ह्यात ना. पंकजा मुडें यांच्या पि.ए.ची टक्केवारी धनंजय मुडेंची शिवराळ भाषा व आमदारावर बलात्कार प्रकरण जिल्ह्या सह राज्यात गाजले.
पुढार्यांच्या ऑडिओ क्लिप ; बलात्काराच्या घटनेने बीड जिल्हा खळबळ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:47
Rating: 5