Breaking News

‘प्रवरा’च्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकरी


प्रवरानगर / प्रतिनिधी - येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांना ऍडव्हन्टमेड इंडिया एल. एल. पी. या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ लाख दहा हजार रुपये असे पॅकेज कंपनीने दिले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. निर्मळ यांनी दिली.

पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे दि. ९ मार्च २०१८ रोजी झालेल्या मुलाखतीद्वारे मेडिकल कोडिंग या विभागात पुणे शाखेसाठी निवड झाली आहे. यामध्ये शामल गायकवाड, अफ्रिन पोपटीया, योगिता दिघे, निकिता वाघ, प्रज्ञा मोरे, राजश्री बनसोडे, कविता मेहता, अक्षदा बोरुडे, पूजा कुमावत, गौरव चिंचोरे, जब्बार शेख आणि कुशल लांडगे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे . 

या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. निर्मळ तसेच प्लेसमेंट विभागाचे प्रमुख एम. एच. कोल्हे व त्यांचे सहकारी टी. पी. डुक्रे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, ज़िल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, आणि संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर आदींनी कौतूक केले.