जामखेडला राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांचे आयोजन
ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा या हेतुने येथिल जामखेड युथ फेस्टिव्हल सांस्कृतिक कला मंच व श्री समर्थ प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तीन दिवस राज्यस्तरीय वैयक्तिक आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
जामखेडसह राज्यातील उभरत्या कलाकारांना व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जामखेड युथ फेस्टिव्हल सांस्कृतिक कला मंच व समर्थ प्रतिष्ठान जामखेडच्या वतीने राज्यस्तरीय वैयक्तिक व समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यस्तरीय वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धा ही शुक्रवार दि. 30 मार्च ते 1 एप्रिल अशी तीन दिवस चालणार आहे. यामध्ये लहान 14 वर्षाखालील गटात प्रथम पारितोषिक 5001 रू, द्वितीय पारितोषिक 3001 रू, तृतीय पारितोषिक 2001 रू, चतुर्थ पारितोषिक 1001 रू, सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्रक तर मोठ्या चौदा वर्षांच्या पुढील वैयक्तिक गटात प्रथम पारितोषिक 5001 रू, द्वितीय पारितोषिक 4001 रू, तृतीय पारितोषिक 3001 रू, चतुर्थ पारीतोषिक 2001 रू, प्रत्येकी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धा ही रविवार दि. 1 एप्रिल रोजी सायं. 6 वा होणार असून यासाठी प्रथम पारितोषिक 15001 रू, द्वितीय पारितोषिक 11001 रू, तृतीय पारितोषिक 7001 रू, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे बक्षिसांचे स्वरुप असणार आहे. ज्या स्पर्धांकांना या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छूक असणार्या स्पर्धकांनी अविनाश बोधले मो. 9495422422 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 30 मार्च ते 1 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता खर्डा रोड कॉर्नर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज बी.एड कॉलेज, जामखेड या ठीकाणी संपन्न होणार आहे. तसेच स्पर्धेचे बक्षीस वितरण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी लगेच करण्यात येणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांकडे गेटपास असणे आवश्यक आहे गेटपास आयोजकाडे उपलब्ध होईल गेटपास नसल्यास प्रवेश मिळणार नसुन महिलांसाठी पासची आवश्यकता नाही.महिलाना विनापास प्रवेश दिला जाणार आहे तरी या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.