पारनेर मध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा
येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तहसिल कार्यालयाच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतचे जिल्हा कोषाध्यक्ष शाहुराव औटी होते. तर या प्रसंगी पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे, तालुका संघटक बाळासाहेब कोकाटे, तालुकाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब नरोडे, उपाध्यक्ष दत्ता झगडे, हरिभाऊ दिघे, डॉ. बाळासाहेब कावरे, महसुलचे अधिकारी, आदी माऩ्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून महसूल विभागाचे अधिकारी व ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते यांनी संयुक्तरित्या पारनेर शहरातील गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, तसेच विविध कार्यालयात जाऊन ग्राहकांना येणार्या समस्यांची माहिती घेऊन महसूलच्या अधिकारी यांनी संबधितांना योग्य मार्गदर्शन करुन ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना करण्यात आल्या. तसेच ग्राहकांना काही अडचणी असल्यास तालुका ग्राहक पंचायत कडे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा कोषाध्यक्ष शाहुराव औटी यांनी यावेळी केले.