खंडाळा येथील जमिनी शेतकर्यांना वहिती करून देणार : पाटील
पंजाब नॅशनल बँकेला 1300 कोटीला चुना लावणारा निरव मोदीची कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील जमिन कर्जत तालुका काँग्रेस पक्ष नांगरून ज्या शेतकर्यांनी जमिनी विकल्या आहेत, त्यांना वहीती करण्यास देणार आहे. याबाबतचे आज दि. 17 शनिवारी खंडाळा येथे हे आदोलन होणार आहे. अशी माहिती किरण पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांनी दिली.
खंडाळा येथील गरीब गरजू शेतकर्यांनी आपल्या जमिनी कमी भावात निरव मोदीला विकल्या आहेत. निरव मोदीने गावकर्यांना दिलेला शब्द पाळला नाही. फायरस्टोनची लाईट फुकट गावाला देण्याचा शब्दही पाळला नाही. देशाला फसवून परदेशात पळून गेला. मग आमच्या जमिनी आम्ही का परत घेवू नये असे संतोष माने यांनी सांगितले.
25 टॅ्रक्टरच्या सहाय्याने डोंगर नांगरून जमिनी वहीती करणार आहोत, हे अंदोलन अँड. कैलास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
या अदोलनात किरण पाटील, प्रविण घुले, बापुसाहेब काळदाते, रघू खरात, भाऊसाहेब तोरडमल, हर्षद शेवाळे, ओकार तोटे आदी सहभागी होणार असून शेतकरीही मोठया प्रमाणात सहभागी होणार आहेत.
निरव मोदी यांस कमी भावाने जमिनी विकल्या आहेत. त्याने ग्रामपंचायतीचा कर 1 रूपायाही भरलेला नाही. निरव मोदी याने देशाला फसविलेले आहे. त्यामुळे आमच्या जमिनी आम्ही परत घेणार. जर निरव मोदी आला तर जमिनी परत करणार असे संतोष माने, भिमराव खंडेकर, बिभिषण महारनवर, नाथा हुलगे, बबन टकले, नामदेव गोयकर यांनी सांगीतले.