Breaking News

चंद्रभागा महाविद्यालयास शासनाकडून मंजूरी


कर्जत येथील समाज प्रबोधन संस्थेच्या चंद्रभामा महाविद्यालयाला शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. कर्जत येथील समाज प्रबोधन संस्थेचे चंद्रभामा महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी या संस्थेच्या माध्यमातून 1999 साली समर्थ माध्यमिक विद्यालय, व 2003 साली कनिष्ठ महाविद्यालय सुरु करून 12 वी चे परीक्षा केंद्र सुरु केले आहे. आता लवकरच चंद्रभामा महाविद्यालय सुरु होणार असून कर्जत तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीत याने निश्‍चित भर पडणार असल्याचे प्राचार्य युसूफ शेख यांनी माहिती देताना सांगितले.