निवडणूक आयोगाच्या आधीच भाजपकडून तारखा जाहीर
निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून, देशातील लोकसभा अथवा विधानसभेच्या निवडूकीच्या तारखा जाहीर करण्याची जवाबदारी या आयोगाकडे असते. निवडणूक आयोग स्वायत्त असल्यामुळे निवडणूकांची तारीख गोपनीय ठेवण्याची जवाबदारी याच आयोगाकडे असते. मात्र मंगळवारी निवडणूक आयोग पत्रकारपरिषद घेत असतांनाच, म्हणजेच निवडणूकांच्या तारीख जाहीर केलेली नसतांना अगोदरच भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी निवडणूकांच्या तारखांची माहिती ट्विट केली. मालवीय यांनी ट्विट केले तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही तारीख जाहीर केलेली नव्हती. पत्रकार परिषद सुरू असतानाच पत्रकारांनी निवडणूक आयोगाकडे मालवीयांनी केलेल्या ट्विबाबत विचारणा केली. तुम्ही अजून घोषणा केली नसताना भाजपा आयटी सेलच्या प्रमुखाने तारीख कशी सांगितली असं आयोगाला विचारण्यात आलं. त्यावर हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी केली जाईल तसंच कठोर कारवाई केली जाईल असं आयोगाने सांगितलं. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या गोपनीय कारभारावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ पाहत आहेे. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी करून, निवडणूक आयोगाने आपला स्वायत्तता आणि गोपनीयता टिकवून ठेवण्याची गरज आहे.