नवनाथ मूर्ती प्रतिष्ठापणा वर्धापनदिनानिमित्त महाप्रसाद
भोपळे गल्ली माळीवाडा येथे पुरातन चैतन्य कानिफनाथ देवस्थानांच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या प्रतिष्ठापनेचा 29 वा वर्धापणदिन गुढीपाडव्याच्या दिवशी होणार आहे. गुढीपाडव्याच्या दुसर्या दिवशी चैत्र शु 2 शके 1940 सोमवार दि. 19 मार्च रोजी दु. 12 वाजेपर्यंत नाथ भक्त मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन गंगानाथ महाराज व नाथ भक्त मंडळाने केले आहे.