Breaking News

सावरकरांच्या पुतळयाला डांबर लावण्याचा प्रयत्न


औरंगाबाद : देशभरात सुरू असलेल्या पुतळा विटंबनाचे लोण औरंगाबादपर्यंत पोहोचले आहे. शहरातील समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळयाला रात्री डांबर लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरातील डीसीपी ऑफिस समोरच हा प्रकार घडला असून, या प्रकारामुळे औरंगाबादेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाला घडणास्थळी बोलावून पुतळयाजवळ स्वच्छता करण्यात आली. या प्रकारानंतर नागरिकांनी रास्ता रोको केला. या सर्व प्रकारानंतर समर्थनगर येथे रास्ता रोको करण्यात आला. आमदार अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, राजू वैद्य, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे तसेच भाऊ सुरडकर, आशिष सुरडकर, लक्ष्मीकांत थेटे हेही घटनास्थळी दाखल होत, हा प्रकार करणा़र्‍या समाजकंटकांना तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.