Breaking News

पिपल्स हेल्पलाईनची 'काळी आई मुक्ती संग्राम'ची घोषणा


अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रसिध्द हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्यासह फायर स्टोन कंपनी व देवीदास चव्हाण याने कर्जत तालुक्यातील खंडाळा या गावात तर होलेवाडी येथे लॅण्ड माफिया, सावकार, राजकीय पुढारी वधनदांडग्यांनी शेतकर्‍यांची लूट करुन अल्पदरात लाटलेल्या हजारो एकर जमीनी मुळ शेतकर्‍यांना परत मिळण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने काळी आई मुक्ती संग्रामची घोषणा करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

प्रसिध्द हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेसह इतर बँकाना ठकवल्याचे उघड झाले आहे. हा घोटाळा उघडकीस येण्यापुर्वीच नीरव मोदी देशातून पसार झाले असून, विजय मल्ल्या प्रकरणानंतर हे मोठे प्रकरणघडले आहे. दोघेही गैरव्यवहार करुन परदेशात पळून गेले. कर्जत तालुक्यातील खंडाळा या गावात नीरव मोदी याने 110 हेक्टर जमीन खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे फायर स्टोन या कंपनीने 110 हेक्टर जमीन तर देवीदासचव्हाण याने 218 हेक्टर जमीन शेतकर्‍यांकडून खरेदी केली आहे. तीघांची मिळून 438 हेक्टर जमीन आहे. ही जमीन शेतकर्‍यांकडून अल्पदरात खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच कर्जत तालुक्यात होलेवाडी येथे दीड हजारएकर जमीन धनदांडग्यांनी शेतकर्‍यांकडून लाटली आहे. होलेवाडी माळढोक पक्षीसाठी आरक्षित असल्याने येथे जमीनीची खरेदी विक्री होत नाही. मात्र खोटी कागदपत्रे तयार करुन लॅण्डमाफियांनी शेतकर्‍यांची लूट करुन याजमीनी लाटल्याचा आरोप अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी केला आहे.