Breaking News

सभापतींच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी उधळल्या नोटा


अमरावती,  अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज राबविण्यात आली. यात भाजपचे विवेक कलोती हे बिनविरोध निवडून आले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नोटांची उधळण केली. मात्र, त्यांना कोणीही अडविले नाही. अमरावती महापालिकेचे स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांचा कार्यकाळ संपला. यावेळी विवेक क लोती यांची निवड करण्यात आली. या रेलीमध्ये भाजपचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.