Breaking News

अग्रलेख देशातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी...


जगभरातील लोकसंख्या वाढीचा वेग हा भारत आणि चीन या दोन आशियाई देशात मोठया प्रमाणात आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत अल्प जमीन, अल्प आर्थिक सुधारणा, आणि मोठी लोकसंख्या असे गणित असल्यामुळे देशातील सर्वच नागरिक सर्वच सोयी-सुविधांचा पुरेपूर वापर करू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे देशभरातील 60-65 टक्के लोकसंख्येचे राहणीमान हे अतिशय सामान्य आहे. त्यात आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, या सर्वच बाबतीत मागासलेले म्हणता येईल, असेच वातावरण आहे. लोकसंख्येच्या प्रश्‍नात आगामी काही वर्षांत भारत चीनला मागे टाकेल, असे भाकित तज्ञांनी वर्तविले आहे. अर्थात यात फार काही वेगळे सांगितले गेले असे नाही. भारतातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे चीन मधील लोकसंख्या वाढीच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. ही वस्तूस्थिती अनेक वर्षांपासुन लक्षात आलेली आहे. जगातील मानव शास्त्र, समाज शास्त्र आणि अर्थ शास्त्र व उत्क्रांतवादाचा सिध्दांत मांडणार्‍यांनी ही वस्तुुस्थिती स्पष्ट केली आहे की मानव समाज संख्येने अधिक असला तरी तो सत्ता संपत्तीवर वर्चस्व निर्माण करु शकत नाही. या उलट तो संख्येने कमी असला परंतु देशाच्या सार्वत्रिक साधन-संपत्तीत त्याचा वाटा अधिक असेल तर तो खरा सत्ताधारी बनतो. जगातिल कोणत्याही सत्ताधारी समाजाकडे पा हिल्यास तो त्या देशातील संख्येन कमी असणारा समाज असतो. परंतु व्यापार, सत्ता-संपत्ती या सगळ्यांवर त्याचा अधिकार जमलेला असतो. भारतातही संख्येने 85 टक्के असणारा बहुजन समाज हा आजही देशाचा सत्ताधारी वर्ग किंवा व्यापारी अथवा संपत्तीधारी वर्ग झालेला नाही. त्यामुळे चिनच्या लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा भारतीय लोकसंख्या वाढीचा दर अधिक असणे ही बाब बहुजन समाच्यादृष्टीने चिंताजनक आहे. आजच्या काळात एकापेक्षा अधिक अपत्याला चांगले शिक्षण देणे आणि त्याचे उत्तम भरण-पोषण करणे आ र्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. चिनने त्यांच्या अतिरिक्त असलेल्या लोकसंख्येलाही मूलभूत गरजा उपलब्ध करुन देण्यात योग्य ते नियोजन केलेले आहे. तेथील प्रत्येक तरुणाला रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टीने पहाता उपलब्ध नैसर्गिक साधन-संपत्ती आणि मनुष्यबळ यांचा योग्य तो समन्वय साधणे जगातल्या अनेक राष्ट्रांना जमलेले नाही. मात्र चिनने हा समन्वय फार चांगल्या पध्दतीने घातला आहे. अतिरिक्त लोकसंख्या असुनही त्यांनी चिनला आज जागतिक व्यापारपेठेचे प्रमुख केंद्र बनविले आहे. आज जागतिक बाजारपेठेते चिनचे जे वर्चस्व आहे ते त्यांनी निर्माण केलेल्या गुणवत्तापुर्ण उत्पादनात आणि कमी उत्पादन खर्चात निर्माण केलेल्या वस्तु जगात सर्वत्र स्वस्त किंमतीत उपलब्ध झाल्यामुळे चिनने बाजारपेठेवर कब्जा मिळविला आहे. प्रश्‍न कीतीही गंभीर असला परंतु जनतेचे हित लक्षात घेवून त्यावर नियोजनाची भूमिका जर सत्ताधारी घेत असतील तर कोणताही प्रश्‍न सुटल्याशिवाय राहात नाही. भारताची सध्याची लोकसंख्या जगात दुसर्या क्रमांकाची असली तरी त्याचे सर्वाधिक मोठे वैशिष्ट्य म्हणजे आज भारतात तरुण वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. ज्या देशात तरुणांची संख्या सर्वाधिक असते तो देश सर्वात सक्षम देश म्हणून ओळखला जातो. मात्र आपल्या देशातील तरुणांचा येथील साधन-संपत्तीशी योग्य समन्वय घालता न आल्यामुळे आजही भारतीय तरुण सक्षम वयात रोजगाराच्या चिंतेने भटकतांना दिसतो. ही चिंता मिटविण्याचे पहिले आव्हान भारताच्या नव्या सरकारासमोर उभे ठाकले. लोकसंख्या वाढीवर लगाम घालून, देशातील सर्वसामान्यांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा लोकसंख्या वाढीचा हा भस्मासूर आपल्यांला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही.