Breaking News

शिवजयंतीनिमित्त ‘स्वच्छ गाव’ संकल्प


लोणी। प्रतिनिधी ;- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्यक्षात आणत येथील साईछत्र ग्रूपच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त ‘स्वच्छ गाव’ संकल्प हाती घेत दाढ या गावात बसविण्यात आलेल्या कचराकुंड्यांचे शिवजयंती मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले. 

शिवजयंती उत्सव फक्त मिरवणूक काढून डि. जे. समोर नाचणे या विकृत, मनमानीला दाढ गावात छेद देण्यात आला. यावेळी साई छत्र युवा ग्रृपने पुस्तक पतपेढी सुरु करण्यात आली. या पुस्तकांचा संच महात्मा फुले विद्यालयाचे प्राध्यापक भोसले यांनी स्विकारला. बालशिवशाहीर रोहित गुंजाळ याने व्याख्यान सादर केले. अश्र्विन बनसोडे व मुकुंद तांबे यांनी मनोगत व्यक्त केले . अथर्व लांडगे याने पोवाडा सादर केला.

मुळा प्रवराचे संचालक देवीचंद तांबे, विखे पाटील कारखान्याचे संचालक प्रताप तांबे, सरपंच पुनम तांबे, माजी सरपंच गोरक्षनाथ तांबे, कामगार तलाठी देवकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. शिवजयंती कार्यक्रमानंतर माजी आ. जयंत ससाणे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन अँड. नकुल तांबे यांनी केले. प्रा. भोसले यांनी आभार मानले.