Breaking News

वाढीव बांधकामांना मालमत्ता कर आकारून पालिका उत्पन्नात भर घालण्याची मागणी

नवी मुंबई, दि. 08 मार्च - शहरात मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकामे झाली असून त्यांना मालमत्ता कर आकारून पालिका उत्पन्नात भर घाला, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी आज अर्थसंक ल्पावरील चर्चेत केली. या वेळी राष्ट्रवादीचे देवीदास हांडे पाटील म्हणाले की, शहरातील 30 टक्के मालमत्ता भाड्याने दिल्यात त्याची नोंदणी करण्यास भाग पाडल्यास मुद्रांक शुल्कातून येणा-या उत्पन्नात वाढ होईल, चाळीतील बांधकामांच्या परवानग्या थांबविल्याने विना परवानगी बांधकामे चालु आहे, त्यामुळे त्यांच्याकडून प्रति घरटी उत्पन्न 35 हजार रुपये मिळत नसल्याने या परवानग्या पुन्हा चालु करण्यात याव्यात. अनेकांनी 18 मीटरच्या घरावर 5 घरे बांधली आहे, तसेच सोसायट्यांमध्येही विनापरवानगी वाढीव बांधकाम केले आहे, त्याचा सर्वे करून कर आकारणी केली, तर मालमत्ता करात वाढ होईल. 


समाजमंदिर व अन्य वास्तू गरज असेल,तर बांधण्यात यावीत, सध्या अनेक वास्तू धूळ खात पडून आहेत, ठाणे मनपाप्रमाणे मागेल त्याला पाणी देऊन उत्पन्नात वाढ होईल, परिवहन सेवेत जिपीएस यंत्रणा विकसित केली, तेथे 4 कर्मचारी ठेवले पण त्याचे आउटपुट अजून मिळाले नसल्याची टिकाही हांडेपाटील यांनी केली. शिवसेना नगरसेवक द्वारकानाथ भोईर या वेळी म्हणाले की, गावठाणात डीपी प्लॅन नाही, सिडकोने सुरुवातीपासून दुर्लक्ष केले; परंतु आपण काय केले आहे. तेथे नियोजनाचा अभाव असून योग्य प्रकारे नियोजन करून सुविधा देणे आवश्यक आहे. यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी. आपण 12 वर्ष कर वाढविला नाही, कर वाढविला तर मत मिळणार नाही असे नाही, असा टोला ठाणे व मुंबईतील शिवसेनेच्या सत्तेचा उल्लेख करत भोईर यांनी राष्ट ्रवादीला लगावला. नियमित करत वाढ केली,तर दुर्बल घटकांना 450 फुटापर्यंत करमाफ करता आला असता. अशी मागणी भोईर यांनी या वेळी केली.