Breaking News

सुधारित घर-कर आकारणी विरोधात सावंतवाडीकरांचे धरणे

सिंधुदुर्गनगरी, दि. 08 मार्च - सावंतवाडी नगरपालिकेने वाढीव दराने सुधारित वाणिज्य स्वरूपात केलेल्या घर-कर आकारणी विरोधात सावंतवाडीतल्या नागरिकांनी बुधवारी नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन पुकारले. याबाबत वरिष्ठ स्तरावर पत्र व्यवहार केला असल्याच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.


सावंतवाडी नगरपालिकेने सावंतवडीतल्या नागरिकांना विश्‍वासात न घेता जी वाणिज्य स्वरूपात घर आकारणी केली आहे, त्यामुळे त्यामुळे सावंतवाडी शहरातल्या नागरिकामध्ये संतापाची लाट आहे. त्यामळे या नागरिकांनी सावंतवाडी नागरपालिकेसमोर धरणे आंदोलन पुकारले. सुधारित कर आकारणी कशी नुकसानकारक आहे, हे या नागरिकांनी स्पष्ट केले आहे. वाढीव दर आकारून पण नाग रिकांच्या सुविधेत वाढ केली का ? हा खरा प्रश्‍न आहे. नगरपालिकेने 26 टक्के पेक्षा जास्त दराने कर आकारणी केली.
त्यामुळे सावंतवाडीकर हैराण झाला आहे. या वाढीव कर आकारणी संदर्भात सर्व नागरिकांनी जिल्हाधिकारी, नगरचनाकार-सिंधुदुर्ग, सावंतवाडी नगराध्यक्ष, मुख्यधिकारी यांना लेखी निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्यात सर्व शहरात हा दर लागू केला पण या शासन निर्णयाने सर्वसामान्य व्यक्ती हैराण झाली आहे. 
सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या नगरसेवकांसह धरणे आंदोलनग्रस्तांची भेट घेतली, त्याच्या समस्या जाणून घेतल्या. वरिष्ठ स्तरावर पत्र व्यवहार केला असल्याच साळगावक र यांनी सांगितले.