Breaking News

भूमि अभिलेख विभागाच्या उप-अधिक्षक लाच घेताना अटक


गडचिरोली - वारसदार म्हणून चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 3 हजार रुपये लाच स्वीकारतांना गडचिरोली येथील भूमिअभिलेख क ार्यालयातील उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. वारलु श्रावणजी कामतवार असे लाचखोर भूमिअभिलेख उपअधिक्षकाचे नाव आहे. 
तक्रारकर्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटसुर ता.एटापल्ली येथे शिक्षक आहेत. 1944 ला तक्रारदाराच्या पुर्वजांनी गडचिरोली शहरातील रामपुरी वार्डात जमीन खरेदी केली होती. सन 1972- 73 रोजी भुमी अभिलेख कार्यालयाकडुन गावठाण जमीनीचे मोजमाप करण्यात आले. त्यावेळी सदरची मालमत्ता ही दुसर्‍यांच्या नावे कार्यालयीन दस्ताऐवजात चुकीची नोंद करण्यात आली होती. तक्रारदार हे सध्याचे वारसदार या नात्याने मालमत्तेत असलेली चुकीची नोंद दुरुस्ती होवुन आपले आजोबाचे नावे करण्याकरीता भुमी अभिलेख कार्यालयास 22 जून 2017 रोजी विनंती अर्ज केले होते. त्या नुसार ते वारंवार कार्यालयात विचारणा करीत होते. परंतु भुमी अभिलेख कार्यालयाकडुन कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही. तक्रारकर्ता हे उपअधिक्षक वारलु श्रावण कामतवार यांची भेट घेतली असता त्यांनी गडचिरोली शहरातील सिट क्रमांक 1 नमुना क्रमांक 2119 या मालमत्तेवरील चुकीच्या नोंदीची दुरुस्ती करुन देण्याकरीता 6 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी के ली. कामतवार यांनी मागितलेली लाच रक्कम देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय गडचिरोली येथे आज 7 मार्च रोजी तक्रार दिली. लाच- लुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार प्राप्त झाल्याने कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी भुमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरात सापळयाचे आयोजन केले. वारलु श्रावण कामतवार, यांनी तक्रारदाराकडुन आर्थिक फायदयाकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने 6 हजार रुपये लाच रक्कमेची सुस्पश्ट मागणी करुन तडजोडी अंती 3 हजार रुपये लाच रक्कम पंचसाक्षीदारासमक्ष स्विकारतांना भुमी अभिलेख कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीचे कृत्य कलम 7 13 (1)(ड) सह 13 (2) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन 1988 अन्वये गुन्हा होत असल्याने पोलीस ठाणे गड चिरोली येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे.