Breaking News

पतंगराव कदम लीलावतीत दाखल ; प्रकृती स्थिर


मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता पतंगराव कदम यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पतंगराव कदम यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीवरून समाज माध्यमावर चर्चेला उधाण आले होते. या सर्व प्रकारामुळे पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांसह हितचिंतकांमध्ये देखील अस्वस्थता पसरली होती. पण, विश्‍वजित कदम यांनी कदम यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केल्यानंतर अफवांना पूर्णविराम मिळाला होता.