Breaking News

भारत-व्हिएतनाम यांच्यात 3 करार


नवी दिल्ली : व्हिएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग सध्या भारत दौ़र्‍यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर आण्विक ऊर्जासमवेत 3 करारांवर स्वाक्ष़र्‍या झाल्या आहेत. संरक्षण निर्मितीत परस्परांमधील सहकार्य वाढविण्याचे दोन्ही देशांनी ठरविले असून तंत्रज्ञानाच्या भागीदारीची शक्यता शोधल्या जातील असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आसियान देशांसोबतचे संबंध आणि ऍक्ट ईस्ट धोरणात व्हिएतनाम अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खुला, स्वतंत्र आणि समृद्ध भारत-प्रशांत भागासाठी दोन्ही देश एकत्रिपणे काम करणार आहे.