Breaking News

महात्मा फुले यांच्या संकल्पनेतील शिवजयंती


प्रा. पवार यांच्या संकल्पनेतुन यावर्षी प्रथमच शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते सयाजी शिंदे आणि सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांची व्याख्याने तरूणांना मार्गदर्शक ठरली. शिवजयंती उत्सवातील सर्व कार्यक्रम तमाम जनतेला संदेश देणारे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे होते. महात्मा फुले यांनी शिवजयंतीचा लोकोत्सव व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. बीडची शिवजयंतीही खर्‍या अर्थाने लोकोत्सव ठरली.