Breaking News

अक्षय प्रकाश योजनेसाठी गावकरी बैठा सत्याग्रह व बोंबाबोंब मोर्चा

गोळेगाव येथील शिववस्ती, बर्डेवस्ती या ठिकाणी अक्षय प्रकाश योजना दोन वर्षापूर्वी मंजूर झालेली आहे. परंतू अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे अद्यापही सुरु नाही. त्यामुळे अहमदनगर येथील ग्रामीण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर दि. 7 मार्च रोजी जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे, जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजय आंधळे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलनाचे आयोजन केल्याचे निवेदन संबंधित अधिकार्‍यांना दिले आहे.


यावेळी ग्रा.पं. सदस्य संजय आंधळे तसेच गावकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोळेगाव ता. शेवगाव येथील शिववस्ती, बर्डे वस्ती या ठिकाणी सिंगल फेज योजनेसाठी 1 वर्षापासून मंजुरीचे आदेश आहेत. काम त्वरित सुरू करणे या बाबत वेळोवेळी गावकरी एम.एस.ई.बी. कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु सदर कार्यालयाचे प्रमुख हे एम.एस.ई.बीचे काम करण्यास एजन्सी मिळत नाही. त्यामुळे टेंडर होत नाही. एजन्सी नेमल्यावर काम सुरु करू असे एक वर्षापासून सांगत आहेत. सदरच्या वस्तीवरील सिंगल फेज योजना मंजूर असून देखील अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे काम सुरु होत नाही. गावातील ज्योतिबा वस्ती येथील सिंगल फेज योजनेसाठी लोकांनी कोटेशन भरून 7 वर्ष झाली आहेत. तेथे अजून योजना मंजूर सुद्धा नाही. असे जर सात वर्ष ग्रामीण भागातील जनतेला कोटेशन भरून वीज उपलब्ध होत नसेल तर यापेक्षा निष्काळजीपणा आणि खुर्च्या गरम करण्यापेक्षा हे काम तरी काय करत आहेत? म्हणून गोळेगाव येथील शिववस्ती, बर्डे वस्ती, ज्योतिबा वस्ती येथील सिंगल फेजचे काम त्वरित सुरु करण्यात यावे अन्यथा शुक्रवार दि.07 रोजी 2018 राजी सकाळी 11 वा. अहमदनगर येथील एम.एस.ई.बी अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ग्रामीण) यांच्या कार्यालयासमोर सर्व गावकरी बैठे सत्याग्रह व बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या होणार्‍या परिणामाची जबाबदारी पूर्णपणे आपल्या कार्यालयाची असेल असे निवेदनात म्हंटले आहे..