Breaking News

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा गौरव


सोलापूर लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पाच महिलांचा लायन्स स्त्री रत्न पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. बुधवारी (दि.7) हॅच फ्री मेसॉनिक हॉल येथे रात्री 8 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष संतोष काबरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्ञान प्रबोधिनीच्या विश्‍वस्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्वर्णलता भिशीकर, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका सुलभा पिशवीकर, ज्येष्ठ साहित्यिक शांता मरगूर, महिलांच्या पुनरुत्थानासाठी कार्य करणार्‍या डॉ. संजीवनी केळकर, प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या व समुपदेशिका प्रिती श्रीराम आदी महिलांना स्त्री रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गुरुवारी दमाणीनगर येथील लायन्स नेत्रालय येथे महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याचेही काबरा यांनी सांगितले.