Breaking News

विभागीय आयुक्तांच्या पॅटर्नच्या झिरो पेन्डन्सीची राज्यस्तरावर दखल


पुणे - कामकाजातील विलंब टाळून ठराविक कालमर्यादेत नागरिकांची आणि प्रशासकीय कामे निर्गत करून लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्यासाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या संकल्पनेतून पुणे विभागात राबविण्यात येणार्‍या झिरो पेन्डन्सी अभियानाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उपक्रमाची यशस्वीतता आणि उपयुक्तता विचारात घेवून त्याच धर्तीवर राज्यातील सर्व विभागात हा उपक्रम 18 एप्रिल 2018 पासून राबविण्याचा शासनाने घेतला असून तसा शासन निर्णयही 15 फेब्रुवारी 2018 रोजी निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली. 
प्रशासन गतीमान असेल तर सर्व प्रश्‍न मिटतात, विकासकामांना गती मिळते. जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना आहेत, या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी वेळेत कामांचा निपटारा होणे आवश्यक आहे. वर्षानुवर्षे जनतेची अनेक प्रकरणे प्रलंबित असतात. ती तातडीने मार्गी लावली जाणे आवश्यक आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुण्याचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी एक वर्षापूर्वी पुणे विभागात झिरो पेंडन्सी ण्ड डेली डिस्पोजल अभियानाला सुरुवात केली. हे अभियान पुणे विभागात यशस्वीपणे राबविण्यात आले.