मीरा भाईंदर पालिकेने नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात - मुख्यमंत्री
ठाणे, दि. 03, मार्च - शासनाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या 75 एकर जमिनीचा उपयोगी सुयोग्य रीतीने करून मीरा भाईंदर पालिकेने नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मीरा-भाईंदर महापालिकेने भाईंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृह आणि मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट या दोन वास्तूंचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयडियल पार्क येथे झाले ,त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, स्व. प्रमोद महाजन यांनी माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडविले आहेत. तर स्व. मीनाताई ठाकरे यांनी आईसारखे प्रेम सर्वाना दिले आहे. त्यांचे स्थान समाजात खूप मोठे आहे. शासनाकडून 600 कोटी रुपये बाजार मूल्याची 75 एकर जमीन मीरा भाईंदर पालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. यात आमदार नरेंद्र मेहता यांचा पाठपुरावा होता असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की या सर्व ठिकाणी मीरा भाईंदर पालिकेने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.