Breaking News

रेल्वे स्थानकादरम्यान अज्ञाताने केली दगडफेक


ठाणे, दि. 03, मार्च - शेलू-नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान एका अज्ञात माथेफिरुने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत नेवाळी येथील तरुण रोहिदास शिवाजी सिनारे (वय-26) हा गंभीर जखमी झाला आहे.
रोहिदास जखमी झाल्याचे समजताच सहप्रवाशांनी त्याला तात्काळ नेरळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी बदलापूर येथील रुग्णालयात पाठवले. दगडफेकीमुऴे त्याच्या हाताची नस तुटली आहे.