देवगड समुद्रात 7 पर्ससीन नौकांवर कारवाई
सिंधुदुर्गनगरी, दि. 03, मार्च - देवगड तालुक्यात गिर्ये पवनचक्की समोरील समुद्रात तीन ते चार वाव जलधी क्षेत्रात बंदी कालावधीत बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी करताना साखरी नाटे येथील सात पर्ससीन नौकांवर कारवाई करण्यात आली. विजयदुर्ग पोलिसांच्या ‘कल्याणी’ या सागर गस्तीच्या बोटीने देवगड-विजयदुर्ग अशी गस्त घालत असताना या नौकांवर कारवाई करण्यात आली. या नौकांवर मासळी असून पोलिसांनी या नौका कारवाईसाठी मत्स्य विभागाच्या ताब्यात दिल्या आहेत. नौकांवर पंचनामा सुरू होता. सात नौकांवर 126 खलाशी होते.
राज्यामध्ये सागरी जलधी क्षेत्रात बंदी कालावधीत पर्ससीन मासेमारी केली जात असल्याने पोलीस व मत्स्य विभागाच्यावतीने या नौकांवर कारवाई केली जात आहे. विजयदुर्ग सागरी गस्तीचे पोलीस शिपाई शितोळे, देवगड सागरी सुरक्षा विभागाचे शिपाई पी. ए. तरवडकर, बोटमास्टर मेंदाडकर, टी. एल. बोरकर हे सागरी गस्त करीत असताना गिर्ये पवनचक्कीसमोरील समुद्रात साखरी नाटे येथील सात पर्ससीन नौका तीन ते चार वाव पाण्यात मासेमारी करताना आढळून आल्या. त्यात साखरी नाटे येथील बशिर मेमन पंगेरकर यांच्या ‘महमंद कासिम अब्दुल्ला’ या नौकेवर 21 खलाशी, शकिरा अय्याज हुना यांच्या ‘सर्जिल’ या नौकेवर 19 खलाशी, संतोष काशिनाथ चव्हाण यांच्या ‘धनश्री’ या नौकेवर 18 खलाशी, इरफान अब्दुल लतिफ बांदिरकर यांच्या ‘यारब’ या नौकेवर 20 खलाशी, सादिक इब्राहिम गवंडे यांच्या ‘अल अहमीद’ या नौकेवर 20 खलाशी, मुनाफ अब्बाज क ोतवडकर यांच्या ‘अजिज’ या नौकेवर 12 खलाशी, इसराल बशिर हुना यांच्या ‘अर्श अफरान’ या नौकेवर 16 खलाशी होते. पोलिसांनी या नौकांवर कारवाई करीत या नौका देवगड बंदरात आणल्या. त्यानंतर या नौका मत्स्य विभागाला कारवाईसाठी ताब्यात देण्यात आल्या. मत्स्य विभागामार्फत देवगड सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी ताम्हणकर यांनी पंचनामा केला.