Breaking News

श्वास आणि उच्छ्वास शास्त्रोक्त पध्दतीने घ्यावा : तांबे


आपण जन्माला आल्यापासून श्वासोश्वास चालू होतो. पण त्याकडे कोणाचेही लक्ष नसते. ती एक नैसर्गिक क्रिया मानली जाते. परंतु त्या क्रियेकडे सुध्दा प्रत्येकाने लक्ष देऊन श्वास आणि उच्छ्वास शास्त्रोक्त पध्दतीने घेतला पाहिजे आणि यालाच 'प्राणायाम' म्हणतात, असे प्रतिपादन संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले.

येथील संगमनेर महाविद्यालयातील डॉ. शशिकांत बांगर लिखित 'प्राणायाम' व 'आरोग्यम् ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयाप्रसंगी केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रांताधिकारी भाऊसाहेब डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, मुख्याधिकारी सचिन बांगर, रासेयो अहमदनगर जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. किशोर डोंगरे, डॉ. हनुमंत कुरकुटे, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा भागवत आदी उपस्थित होते. 

नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, 'प्राणायाम' हे प्रा. डॉ. शशिकांत बांगर यांनी प्रकाशित केलेले पुस्तक विद्यार्थी, महिला, तरुण, वृध्द आणि एकंदरीतच संपूर्ण समाजासाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. तसेच 'आरोग्यम् ' हे पुस्तक महिलांना, तरुणांना, वृध्दांना तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येक कुटुंबाच्या घरी संग्रहणीय असावे, असे आहे. संस्कृतीकडे जी भारतीय दिनचर्या, ऋतुचर्या, संतुलित आहार या गोष्टी होत्या. त्या आताच्या नवीन पिढीमध्ये दिसून येत नाहीत. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी बांगर यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रताप फलफले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक मयुरी आंबरे व अपेक्षा आहेर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी परिश्रम घेतले. डॉ. किशोर डोंगरे यांनी आभार मानले.