Breaking News

‘प्रवरा’मध्ये कॅम्पस मुलाखतीचे आयोजन


प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात मॅक्लीऑइड्स फार्मा या नामांकित कंपनीचा पूल कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केल्या आहेत. दि. २० आणि २१ मार्च रोजी विद्यार्थी निवड प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.

या इंटरव्ह्यूद्वारे गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. पदवी, पदविका आणि पदयुतर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी या मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या मुलाखतींद्वारे ए. डी. एल. पी. आय., ए. डी. एल. फॉर्मुलेशन, प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल अशा विविध विभागांत नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी या मुलाखत प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निर्मळ यांनी सांगितले.