Breaking News

जाचक वसुलीविरोधात काँग्रेसचा भव्य मोर्चा


महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागाच्यावतीने काढलेले जाचक आदेश व नोटीसा रद्द करण्याच्या मागणीसाठी संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने आज {दि. १६} शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासनाला दिले.

छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन करुन हा मोर्चा नवीन नगर रोडमार्गे प्रांत कार्यालयावर आला. यावेळी अ‍ॅड. माधवराव कानवडे, डॉ. संजय मालपाणी, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, शहराध्यक्ष विश्‍वासराव मुर्तडक, भाऊसाहेब कुटे, आर. बी. राहाणे, आर. एम. कातोरे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, बाळासाहेब पवार, सभापती निशा कोकणे, सुहासिनी गुंजाळ, संयोत वैदय, हरिष चकोर, प्रा. बाबा खरात, हिरालाल पगडाल, सिताराम राऊत, अशोक भुतडा आदींसह हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

सरकारच्या महसूल विभागाच्यावतीने शहरासह तालुक्याच्या काही भागांत तुकडा बंदी आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरुन सरकारी मूल्याच्या २५ टक्के रक्कम भरण्याचे आदेश देणार्‍या नोटिसा महसूल विभागाने काढल्या आहेत. हजारापासून लाखो रुपये वसूलीच्या या नोटिसा बजावल्यानंतर रक्कम न भरल्यास जमिनी, भूखंड सरकारजमा करण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत. त्यामुळे जागा मालक हादरुन गेले आहेत. आयुष्यभराची पुंजी खर्चून घरासाठी गुंठा, अर्धा गुंठा जागा घेतलेले गोरगरिब लोक रडकुंडीला आले आहेत. या अन्यायकारक नोटिसा व वसूलीचे आदेश तातडीने रद्द करावे तसेच वसूलीपोटी सील केलेल्या मिळकतीवरील सील काढून टाकावे. नव्याने नोटिसा देवू नयेत. शुल्क वसुलीच्या आकारणीचे दर संपुष्टात आणावे व या वसुलीच्या रक्कमा नागरिकांकडून मूळीच घेऊ नये. भविष्यात कोणत्याही विषयाची नोटिस किंवा आदेशामध्ये अपिलीय अधिकार्‍याचा उल्लेख असावा. अपिल करतांना स्थगिती आदेश मिळविण्यासाठी शुल्क आकारणी रद्द करण्यात यावे. तसा प्रस्ताव शासनास पाठविण्यात यावा, अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

मोर्चाला मार्गदर्शन करतांना अ‍ॅड. माधवराव कानवडे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला नवनववीन अध्यादेश काढून छळविण्याचा हा प्रकार थांबला पाहिजे. हे शासन म्हणजे अन्यायकारी असून वसुलीचे हे आदेश तातडीने मागे घ्यावेत. मागील सरकारच्या काळातही अनेक निर्णय झाले. पण त्यातून सामान्य जनतेला त्रास झाला नाही. आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूल खात्याला खर्‍या अर्थाने जनतेपतर्यंत नेले. कोणतेही कर लावले नाही. याउलट अधिक सुटसुटीतपणा व सुविधा उपलब्ध करुन दिल्या. ग्रामीण भागातील सेवा सोसायट्या, दूध संस्था यांनाही काढलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. यावेळी डॉ. संजय मालपाणी, संयोत वैद्य, सिताराम राऊत, अजय फटांगरे, हिरालाल पगडाल आदींनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी बाळासाहेब मोरे, पांडुरंग घुले, अवधूत आहेर, किशोर पवार, गजेंद्र अभंग, कुंदन लहामगे, किशोर टोकसे, नितीन अभंग, धनंजय डाके, मिलींद औटी, बाबासाहेब गायकर, रोहिदास पवार, शैलेश कलंत्री, विलास कवडे, दत्तात्रय खुळे, गणेश गुंजाळ, अभिजीत ढोले, जगन आव्हाड, बाळकृष्ण कर्पे, लाला दायमा, सोनाली शिंदे, रुपाली औटी, मनिषा भळगट, मिनानाथ वर्पे, राधू जाधव, वृषाली भडांगे आदी उपस्थित होते. मोर्चे