Breaking News

नागरी समस्या कळवाव्यात : आदिक


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी - शहरातील नागरिकांना सर्व नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न असून नागरिकांनी समस्या पालिकेला कळवाव्यात, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले. बुधवारी सकाळी प्रभाग क्रमांक सहामधील शिवपार्वती मंदिर, साळुंके बिल्डिंगलगतच्या रस्त्याच्या कामाचे उदघाटन नगराध्यक्षा आदिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

शहरातील नागरिकांना सर्व नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. शहरातील बऱ्याच रस्त्यांची कामे झालेली आहेत. उर्वरित सर्व रस्ते लवकरात लवकर करण्यात येतील असे त्या म्हणाल्या. यावेळी भाजपचे नगरसेवक किरण लुणिया, नगरसेवक राजेंद्र पवार, अदित्य आदिक, माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, नगरसेवक रवि पाटील, दीपक चव्हाण, प्रकाश ढोकणे, कलीम कुरेशी, विजय शिंदे, संतोष कांबळे, सागर भागवत, अनिरुद्ध भिंगारवाला, वर्षा शिंदे, तमन भटियानी, राजेंद्र पठाडे, विजय नगरकर, बहासाहेब खोसरे, अभय गांधी, उदय साबळे, विशाल फटांगरे, समीर पठाण, आकाश गायकवाड, काळूराम राधे, रणजित पाटील, निसुख बेडेकर, किशोर भूतकर, सोनाथ वऱ्हाडे, नारायण पगारे, जय गांधी, दत्तात्रय जाधव, गणेश कर्नावट, अशोक तायडे आदींसह उपस्थित होते.