Breaking News

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी


कऱ्हे घाटाजवळील मोबाईल टॉवरच्या ९० हजार रुपये किंमतीच्या ४८ बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. सोमवारी रात्री दहा ते मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तेथील रखवालदार अशोक शिवगीर गोसावी (रा. कऱ्हे फाटा, ता. संगमनेर) यांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील कऱ्हे गावच्या शिवारात कऱ्हे घाटात मोबाईल टॉवर आहे. तेथे रखवालदार म्हणून गोसावी हे नोकरी करतात. सोमवारी रात्री ते झोपले असताना दहा ते मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास चोरट्यांनी खोलीतील ४८ बॅटऱ्या चोरून नेल्या. ही घटना झोपेतून उठल्यानंतर गोसावी यांच्या लक्षात आली. त्यांच्या फिर्यादिवरून मंगळवारी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक किशोर पालवे हे करीत आहेत.