Breaking News

कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली :डॉ. शिरोळे


अळकुटी /प्रतिनिधी /- कॉलेज जीवनात शिक्षण घेत असताना तरुणांनी विविध कार्यक्रमामधून सहभाग घेऊन स्वतः चा व्यक्तिमत्व विकास करावा. वार्षिक स्नेहसंमेलन हे स्वतःला सिध्द करण्याचे एक महत्वाचे व्यासपीठ आहे. कॉलेज जीवनाचा आनंद घेत असतांना चांगला अभ्यास करावा. जीवनात यशस्वी व्हावे. कारण कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली आहे. असे वक्तव्य काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे यांनी केले. 

पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये डॉ. शिरोळे बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच बाबाजी भंडारी ,उपसरपंच मधुकर जाधव,अळकुटी ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन महेश शिरोळे, सेवा सोसायटी चेअरमन बाळासाहेब पुंडे,माजी चेअरमन बाळासाहेब चौधरी,आदर्श शिक्षक अप्पासाहेब ठुबे, नामदेव चाटे ,प्राचार्य रावसाहेब पवार ,उपप्राचार्य अर्जुन चाटे, विद्यापीठ प्रतिनिधी वृषाली चौगुले व शिक्षक ,विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद पारखे व आभार प्रदर्शन प्रा. कुंड कवडे यांनी केले.